मुंबई : बारावी फेरपरीक्षेचा निकालासंदर्भात एक महत्त्वाचे वृत्त हाती आले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव के.बी.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २१ ऑगस्टला दुपारी ३ वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेचे वाटप २४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता ज्युनियर कॉलेजमधून करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
फेरपरीक्षेच्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण वेबसाईटवर दिसणार असून या माहितीची प्रिंटआऊटही त्यांनना काढता येणार आहे.
गुणपडताळणी करायची असलेल्या विद्यार्थ्यांना २२ ते ३१ ऑगस्टदरम्यान अर्ज करावा लागणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत ११ सप्टेंबरपर्यंत आहे.