नागपूर : नागपुरात आज कोरोनाचा स्फोट झाला आहे. आज तब्बल 1710 कोरोनाबाधितांची नागपुरात भर पडली आहे. त्यामुळं सर्वांचीच चिंता वाढली आहे. आज शहरात 1433 तर ग्रामीणमधील 275 रुग्णांचा समावेश आहे. तर 8 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. यामध्ये 3 शहरात व तीन ग्रामीणमधील मृत्यू आहे. तर 2 मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा आलेख सातत्यानं वाढत आहे. गेल्या 10 दिवसांत नागपुरात 12 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित वाढले आहे. नागपुरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 62 हजार 52 इतकी झाली आहे.
नागपूरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. मार्चच्या पहिल्या नऊ दिवसांतच 10 हजार 500 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अनेक निर्बंध लावले आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाणार आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाची रुग्णांची संख्या
1 मार्च 2021 - 877
2 मार्च 2021 - 955
3 मार्च 2021 - 1152
4 मार्च 2021 - 1070
5 मार्च 2021 - 1393
6 मार्च 2021 - 1183
7 मार्च 2021 - 1271
8 मार्च 2021 - 1276
9 मार्च 2021 - 1338
10 मार्च 2021 - 1710