सांगली : क्रिकेटमुळे प्रसिद्धीस आलेला क्रिकेटर अंबाती रायडू यांचं क्रिकेटनंतर शेतीवर प्रेम असल्याचं त्याने म्हटलं आहे, क्रिकेटनंतर मला शेतीतच कामात येणार असल्याचं अंबाती रायडू यांने म्हटलं आहे.
अंबाती हा मूळचा आंध्र प्रदेशातला आहे, आंध्रात त्यांची ४० एकर शेती आहे, शेतीत आपण ४० एकर डाळिंबाची लागवड केली आहे.
मात्र आंध्रचं वातावरण हे महाराष्ट्रापेक्षा तुलनेने उष्ण असल्याने, डाळिंब बाग फुलवण्यास त्याला अडचणी येत आहेत, या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांने सांगली जिल्ह्यात डाळिंबाची शेती करणारे दादासो पाटील यांची शेती गाठली. अंबातीने सांगतील त्यांच्या शेतात जाऊन सेंद्रीय डाळिंब शेतीचे धडे घेतले.
क्रिकेटनंतर आपल्याला शेतीची आवड असल्याचं अंबाती रायडूने आपल्याला सांगितल्याचं सांगलीचे दादासो पाटील यांनी सांगितले. अंबाती देखील सेंद्रीय पद्धतीने डाळिंबाचे उत्पन्न घेण्यावर जोर देणार आहे.