Manorama Khedkar New Video: आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या संदर्भातील वाद संपत नाहीत तोपर्यंच आई मनोरमा खेडकर यांच्या वादाची मालिका समोर येत आहे. खासगी ऑडीला अंबर दिवा, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, नावात बदल अशी अनेक प्रकरणे पूजा खेडकरांच्या बाबतीत समोर येतायत. पण त्यांच्या आई संदर्भातही व्हिडीओ समोर येत आहेत.मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांनी शस्त्र परवान्याच्या अटी आणि शर्थींचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलीय. या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे. दरम्यान मनोरमा यांच्याशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामधे त्या मेट्रो अधिकारी आणि पोलीसांसोबत हुज्जत घालताना दिसतायत. 2022 मधील ही घटना असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ती रेकॉर्ड केलीय.
VIDEO| मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल #IASPoojaKhedkar #ManoramaKhedkar pic.twitter.com/QPjvBC37xl
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 16, 2024
खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कायासाठी असलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्या हमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यां सोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकार्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला.
पूजा खेडकरच्या नावात देखील विसंगती दिसून येत आहे. 2019 ला त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी यादीमध्ये त्यांचे नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावाने सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग deeliprao असे लिहिण्यात आले आहे. आता 2021 ची यादी पाहिल्यावर असे लक्षात येते की, त्यात त्यांचे नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे आहे. म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी मनोरमा आईचे नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाची स्पेलिंग dilip हे सरळ लिहिण्यात आले आहे. आता नावातील हे बदल का करण्यात आले? ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजे एफिडेव्हिट किंवा कोर्ट ऑर्डर आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी मोटारीवर अंबरदिव्याचा वापर केला होता. तसेच खेडकर यांच्या आईने शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखवलेला धाक दाखवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आला.
पूजा खेडकर यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र वादात सापडले आहे. दिव्यांग नसताना त्यांनी केवळ सवलत मिळावी म्हणून खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप पूजा यांच्यावर आहे. याप्रकरणी पूजा खेडकरांची चौकशी केली जाणार आहे. दिव्यांगांची संघटना याबाबत आक्रमक झाली आहे. त्यांनी याप्रकरणी आयुक्तांकडे निवेदन दिलं होतं. त्यानुसार दिव्यांग आयुक्तांकडून पुणे पोलीसांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना कोणत्या रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं? यावेळी त्यांनी काय कागदपत्र जोडली होती? अशा सर्व प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. इथेच पूजा यांच्या अडचणी संपल्या नाहीत. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी आयएएस पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा अहवाल मागवून घेतला आहे. आहे. पूजा खेडकर यांना अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय समितीतील सदस्यांचे खुलासे मागवण्यात आले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी हे आदेश काढले आहेत.