Kolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल

Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळं एकच खळबळ. एक डॉक्टर, महिला, अश्लील चाळे आणि.... एका घटनेमुळं संपूर्ण राज्यातून संतापाची लाट. पाहा नेमकं काय घडलं...  

Updated: Mar 29, 2023, 11:22 AM IST
Kolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल title=
Kolhapur crime news obscene photos of women with doctor goes viral latest Marathi news

Kolhapur News : काही मालिका प्रत्यक्षात घडणाऱ्या प्रसंगांशी इतक्या मिळत्याजुळत्या असतात की, पायाखालची जमीनच सरकते. नुकतीच कोल्हापुरात अशीच एक घटना घडली. जिथं, एका डॉक्टरच्या कृत्यानं खळबळ माजली आहे. कोल्हापुरातील मुरगूड गावात ही घटना घडली असून, सध्या तिथं गावात पेन ड्राईव्ह, निनावी पत्र आणि अश्लील पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. सदर घटना पाहता 'देवमाणूस' या मालिकेचीच आठवण होत आहे. 

नेमकं घडलंय काय? 

कोल्हापुरात एका डॉक्टरनं महिलांशी अश्लील चाळे करत त्यांचे फोटो, व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कहर म्हणजे हा डॉक्टर बोगस असून, त्यानं आतापर्यंत जवळपास 80 महिलांशी गैरवर्तन केल्याची बाब समोर आली आहे. या डॉक्टरच्या कृत्यांबाबत कळताच नागरिकांनी संतप्त भावनेनं शेकडे निनावी पत्र गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना पाठवत या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. सध्या हा डॉक्टर फरार असून, उघडकीस आलेल्या प्रकारामुळं मुरगूडमध्ये संतापाची उसळली आहे. 

मुरगूडकरांचं म्हणणं काय? 

'आम्ही सर्व मुरगूडकर आपणास एक निवेदन करून ईच्छीतोकी, क्रांतीकारकांचे गाव म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मुरगूड शहराची प्रतीमा एका कथित डॉक्टरमुळे मलीन होत आहे. त्या डॉक्टरने केलेल्या काळया कृत्याचा गेल्या काही दिवसापासून मुरगूड मध्ये नागरीकांना त्रास होत आहे. महिलांच्या असहाय्यतेचा आणी गरिबीचा फायदा घेवून या डॉक्टरने हे कृत्य केलेचे समजते. वेळोवेळी महीलांना पैशाचे अमिश दाखवून डॉक्टरने हे कृत्य केले असल्याचे समजते', असा सूर आळवत बदनामी आणि डॉक्टरच्या दहशतीमुळं महिला तक्रार करण्यास पुढेही येत नसल्याची बाब इथं अधोरेखित करण्यात आली. 

हेसुद्धा वाचा : Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

 

 

Kolhapur crime news obscene photos of women with doctor goes viral latest Marathi news

 

घडला प्रकार वाचून धक्का बसेल... 

हा कथित डॉक्टर त्याच्याकडे आलेल्या महिला रुग्णांसोबत अश्लील चाळे करत होता. या कृत्याचे व्हिडीओ त्यानं लॅपटॉपमध्ये ठेवले होते. ज्यावेळी लॅपटॉप दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला तेव्हाच महिलांसोबतचे त्याचे हे व्हिडीओ व्हायरल झाले.