प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर : सणवाराला गोडाधोडाचं जेवण सगळीकडेच करतात. काही घरांमध्ये राष्ट्रीय सणांनाही पक्वान्न केली जातात. मात्र तांबडा-पांढऱ्या रश्श्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाला घराघरात जिलेबीची मेजवानी असते.
तांबडा-पांढरा रस्सा खाणारे कोल्हापूरकर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबीवर आडवा हात मारतात. या दोन दिवसांना तब्बल 90 हजार किलो जिलेबी कोल्हापूरकर फस्त करतात. शहराच्या चौकाचौकात जिलेबीचे ठेले लागतात. राष्ट्रीय सणांना जिलेबी खाण्याची 90 वर्षांची परंपरा आजही कायम आहे. एरवी तिखटाशिवाय ज्यांचं पान हलत नाही, असं कोल्हापूर राष्ट्रीय सणांना 80 लाखांची जिलेबी फस्त करतं. कोल्हापुर आणि जिलेबीचं जुनं नातं आहे.
जस पाडव्याला घरोघरी पोळी, दिवाळीला फराळ असतो. तसा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवातिला जिलेबी असते.. माज्या माहितीप्रमाणे 35 ते 40 वर्षा पूर्वी जेलेबीचा स्टॉल सुरू झाला.. जेलिबे स्टोल वर देशभक्तीपर गीत लागायची.. कोल्हापूरकारणी हा दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केलेला आहे.
गरीब असो, वा श्रीमंत... स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला जिलेबी हवीच. एरवीही शहरात दररोज सहा हजार किलो जिलेबी खपते. मात्र राष्ट्रीय सणांची बातच और... इतर टायमाला वेगळं.. पण 26 जानेवारीला वेगळं.. या वेळी कोणी देखील हौसे, गवसे, नवसे खातात,प्रत्येक जण वाटत असतात.
शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ सापडतो. कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर कुस्ती मारलेल्या मल्लाचं तोंड जिलेबीनं गोड करत असत. ती परंपरा आजही कायम आहे. त्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. रामचंद्र बाबाजी माळकर याचा धंदा आहे. त्यांची पाच मूल होती. आता सूनादेखील जिलेबीचा व्यवसाय करतायत.