22 Feb 2025, 10:06 वाजता
सीईटी नोंदणी अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
CET Date : सीईटी सेलने 2025-26 वर्षाच्या इंजिनिअरिंग, फार्मसी.बी. प्लॅनिंग, एम प्लॅनिंग आणि अग्रीकल्चर एज्युकेशन या अभ्यासक्रमांच्या एमएचटी सीईटी या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येईल. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची ही शेवटची संधी असणार आहे.
22 Feb 2025, 09:52 वाजता
मुंबई विद्यापीठात पदवीचे शिक्षण आता ऑनलाईन
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे कोर्सेस ऑनलाइन सुरू केले जाणार आहेत....एम. ए. समाजशास्त्र या विषयाच्या पदव्युत्तर पदवी कोर्सेसह, मायक्रो क्रेडिटचे 15 अभ्यासक्रम विद्यापीठाने संपूर्णपणे डिजिटल स्वरूपात तयार केले आहेत.... त्याचबरोबर येत्या 3 ते 4 महिन्यांत बी. कॉम, एम. कॉम, एमएमएस आदी काही कोर्सेसच्या दोन सत्रांचा अभ्यासक्रमही डिजिटल स्वरूपात तयार केला जाणार आहे....येत्या शैक्षणिक वर्षापासून हे कोर्सेस डिजिटल स्वरूपात सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Feb 2025, 09:47 वाजता
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
Railway Megablock : मध्य रेल्वेवरील अंबरनाथ-वांगणी आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-मरीन लाईन्सदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे... रात्रकालीन ब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे...अंबरनाथ-वांगणीदरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठी रात्री 1.30 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे...त्यामुळे रात्री 11.13ची परळ-अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकार्यंत चालवण्यात येईल... तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मरिन लाईन्सदरम्यानच्या पादचारी पुलासाठी मध्यरात्री 1.15 ते पहाटे 4 वाजून 15 मिनिटापर्यंत ब्लॉक असणार आहे..
22 Feb 2025, 08:59 वाजता
न्यू इंडिया को-ऑप बँक अनियमितता प्रकरण, बँकेचे माजी सीईओ अटकेत
New India Cooperative Bank Update : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोअनला अटक केलीय... मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर अभिमन्यू भोआनला अटक केलीय... भोअनला या घोटाळ्याची माहिती होती. तसेच बँकेतून काढण्यात येणाऱ्या पैशाप्रकरणी वेळोवेळी भोअनला हिस्सा मिळत असल्याचा संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
22 Feb 2025, 08:37 वाजता
पुण्यातील जागेवरुन भाजप-शिवसेनेत वाद?
Pune Land : शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेला भूखंड खाजगी विकसकाला देण्याच्या निर्णयावरून शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे... माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील हा निर्णय झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय... हा निर्णय रद्द करून त्या जागेवर कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी केलीय...
22 Feb 2025, 08:12 वाजता
सुरेश धस मस्साजोग आणि परळीत जाणार
Suresh Dhas : आमदार सुरेश धस मस्साजोगला जाणार आहेत. तिथे ते देशमुख कुटुंबीयांची भेट घेणारेत.... त्यानंतर ते दुपारी परळीत जाणार आहेत. महादेव मुंडे कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.
22 Feb 2025, 08:10 वाजता
अध्यक्षीय भाषणातून तारा भवाळकरांचे खडे बोल
Delhi : दिल्लीत 98वाव्या साहित्य संमेलनाला सुरुवात झालीय. अध्यक्षीय भाषणातून तारा भवाळकरांनी मोदी व्यासपीठावर असताना पुरोगामीत्वाबद्दल सुनावलंय...पंतप्रधानांना जी विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून दिली ती आमच्या उदार संस्कृतिचं प्रतिक आहे...भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही...मराठी भाषा जोडणारी आहे, म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचं प्रतिक दिलंय...मराठी संत पुरोगामी होते, महाराष्ट्र पुरोगामी आहे असं सांगितलं. जिथं संमेलन आहे तिथं मराठ्यांनी छावणी टाकली होती असा इतिहासाचा संदर्भही तारा भवाळकरांनी दिला. अध्यक्षांच्या या भाषणानं उपस्थित श्रोत्यांची मनं जिंकली...भाषणाच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट होत होता.