Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 22, 2025, 18:54 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

22 Feb 2025, 18:34 वाजता

बेळगावात मराठी भाषिक टार्गेट, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

 

Pune Shivsena Aggresive : बेळगावमध्ये मराठी कंडक्टरला मारहाणीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद... पुण्यात शिवसैनिक आक्रमक, लक्ष्मीनारायण थिएटर इथं कर्नाटकची बस अडवून बसला फासलं काळं.. यावेळी शिवसैनिकांनी कर्नटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

22 Feb 2025, 16:58 वाजता

छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावर मास कॉपी

 

Mass copy in CSN Exam Center : छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीच्या आदर्श सेकंडरी स्कूलमधील केंद्रावर मास कॉपी सुरु असल्याचं आढळून आलंय...मास कॉपी सुरु असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी हा प्रकार उघड करत सर्व कॉप्या जप्त केल्या आहेत.. 12वीचा गणिताचा पेपर सुरू असताना ही घटना उघडकीस आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Feb 2025, 14:27 वाजता

शंभूराजेंचं स्मारक लवकरच उभारणार - उदय सामंत

 

Uday Samant : संगमेश्वरमधल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाच्या झी २४ तासच्या बातमीची सरकारकडून दखल घेण्यात आलीय... वर्षभरात स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय...तसेच स्मारकाच्या कामासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याची हमीही त्यांनी दिलीय... दरम्यान जागेच्या अडचणीमुळे स्मारकाचं काम रखडलं होतं असं उदय सामंतांनी सांगितलंय..

22 Feb 2025, 14:24 वाजता

शेअर बाजारात मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत लूट 

 

Solapur Fraud : सोलापुरात शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल 15 कोटी रुपये लुटल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. निवृत्ती पैलवान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पैलवान हा शेअर बाजार शिकवण्याचे क्लासेस चालवत होता.  यावेळी संपर्कात आलेल्या लोकांना मोठ्या परतव्याचे आमिष दाखवत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले आणि त्यांना लूटलं. या प्रकरणात फिर्यादी आशिष पाटील याने 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून ही कारवाई केली. 

22 Feb 2025, 14:22 वाजता

नागपुरात GBSमुळे आणखी एकाचा मृत्यू

 

Nagpur GBS : नागपुरात GBSमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय..  शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका ३२ वर्षीय रुग्णाचा GBSमुळे मृत्यू झालाय.. त्यामुळे नागपुरातील मृतांची संख्या आता तीनवर गेलीये. दगावलेला रुग्ण हा मध्यप्रदेशचा आहे, प्रकृती खालावल्यावर त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते... आतापर्यंत नागपूर शहरात GBSचे २१ रुग्ण आढळून आलेत.. यातील दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.. 

22 Feb 2025, 13:39 वाजता

जगावर पुन्हा कोरोनाचं सावट?

 

Corona New Variant : चीनच्या संशोधकांनी वटवाघुळांमधील एका नवीन कोरोना व्हायरस शोधून काढला आहे, ज्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहान येथून करोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला होता, ज्यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर आता व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली यांच्या नेतृत्वाखालील चिनी संशोधकांच्या एका टीमने वटवाघुळांमधील नवीन करोना व्हायरस शोधला आहे. या नवीन व्हायरसचे नाव ‘HKU5-CoV-2’ असे आहे..हा नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-१९ प्रमाणेच आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Feb 2025, 12:46 वाजता

मालेगावात भूमाफियांचं रॅकेट सक्रिय 

 

Malegaon : मालेगावातील भूमाफियांनी अनेक मालमत्ता धारकांना गंडा घातलाय....आतापर्यंत आठ जणांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे....दरम्यान 10 कोटी 60 लाखांची फसवणूक झाली असल्याची समोर आली आहे...भूमाफियांना राजकीय नेत्यांचं पाठबळ असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय...वारंवार तक्रारी करूनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप मालमत्ताधारकांनी केलाय...  

22 Feb 2025, 12:26 वाजता

सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात?

 

Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यताय.सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीये. त्यावरून आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आलीये. सुरेश धस यांनी निवडणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. शासकीय कर्मचा-यांवर दबाव टाकून मतदान करण्यास सांगितल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आलाय. याप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Feb 2025, 11:40 वाजता

केंद्र संचालकानंच फोडला मराठीचा पेपर

 

Yavatmal : यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथे दहावीचा पेपर फुटला होता.. केंद्र संचालकानेच हा पेपर फोडला असल्याचे उघड झालंय. याप्रकरणी केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठारी येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिलाच पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर तहसीलदार आणि शिक्षण विभागाच्या पथकानं परीक्षा केंद्रावर जाऊन चौकशी केली.. त्यात केंद्र संचालकानेच पेपर सोशल मीडियावर टाकल्याचं निष्पन्न झाले.. या प्रकरणी दोघांविरोधात महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

22 Feb 2025, 10:50 वाजता

जालन्यात 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

 

Jalna Accident :  जालन्यात पुलाचं काम करणारे कामगार झोपेत असताना एका डंपर चालकानं त्यांच्या शेडवर वाळू टाकली.. वाळूच्या वजनाने या मजुरांच्या अंगावर शेड कोसळलं.. आणि या शेडखाली झोपलेल्या 5 मजुरांचा जागीच मृत्यू झाला.. जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रस्त्यावर ही घटना घडलीये. सकाळी मजुरांसाठी उभारलेलं शेड आढळून न आल्यानं ही घटना उघडकीस आलीय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढलंय.या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.