धुळे : या मतदारसंघात वंचित आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. युती झाल्यामुळे भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपकडून सध्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपला फटका बसू शकतो. अनिल गोटे हे भाजपचा प्रचार करणार नाहीत. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा ४,७२,५८१ मतांनी पराभव केला होता. याआधी २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या प्रताप सोनवणे यांचा विजय झाला होता.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
सुभाष भामरे | भाजप | 529450 |
अमरिष पटेल | काँग्रेस | 398727 |
ईशी योगेश यशवंत | बसपा | 9897 |
अन्सारी निहाल | आप | 9339 |
रमेश मोरे | अपक्ष | 8057 |