नंदुरबार : या मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा एकदा निवडणुकीच्य़ा रिंगणात आहेत. तर काँग्रेसने अॅड.के.सी.पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे याचा फटका भाजपला बसू शकतो. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीत हिना गावित यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा १,०६,९०५ मतांनी पराभव केला होता. नंदुरबार हा आदिवासीपट्टा आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. माणिकराव हे येथून ९ वेळा खासदार झाले होते.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
हिना गावित | भाजप | 579486 |
मानिकराव गावित | काँग्रेस | 472581 |
नोटा | नोटा | 21178 |
अमित वसावे | बसपा | 12133 |
सोबजी गावित | अपक्ष | 9184 |