सातारा : बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. मात्र ही विषबाधा करणीच्या प्रकारातून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बारामतीच्या भोंदूबाबाने प्रसादरुपी औषध मांढरदेवीचे दर्शन घेतल्यानंतर प्यायल्याने त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर कुटुंबातील स्वप्नील चव्हाण या युवकाचा उपचाराआधीच वाटेत मृत्यू झाला. तर चार जण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सर्व प्रकरणाचा तपास वाईचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करत आहेत. तृप्ती विष्णू चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, सविता विष्णू चव्हाण, मुक्ताबाई नारायण चव्हाण आणि
भिमसेन जाधव यांच्यावर उपचार सुरु आहेत.