Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री पद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं.   

Updated: Nov 27, 2024, 10:31 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री पद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?   title=
Maharashtra Assembly Election 2024 Vidhan Sabha not Cm but gaurdian minister is the new topic of disagreement in mahayuti know details

ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई : (Maharashtra Assembly Election 2024) देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर पक्षांच्या साथीनं महायुती झाली आणि या महायुतीनं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतं दिली असतानाच आता निकालानंतर राज्यात नवी सत्ता केव्हा स्थापन होणार आणि मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचीच उत्सुकता सामान्यांसह राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे. 

इथं मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत अजूनही पेच कायम असून, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यावरून सध्या मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. निकालानंतर चार दिवस उलटून गेले तरीही सीएमपदावर तोडगा निघालेला नाही, तेव्हा आता याबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हाच प्रश्न उपस्थित आहे. 

हेसुद्धा वाचा : '230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ महायुतीला कसा लागला? याचं उत्तर...'; ठाकरेंचा हल्लाबोल

 

प्रत्यक्षात दुसरीकडे मुख्यमंत्रीपद राहिलं दूर पण आता महायुती सरकारच्या सत्तास्थापनेपूर्वी मंत्रिपदांवरून दावेदारी केली जात असल्याची माहिती सूत्रांमार्पत मिळाली आहे. राज्यातील ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तिन्ही पक्षांत रस्सीखेच असून मंत्रिपदासह पालकमंत्रिपदांवरूनही तिढा पाहायला मिळत असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. प्रामुख्यानं राज्यातील बीड, पुणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी या पालकमंत्रिपदांसाठी रस्सीखेच पाहायला मिळत असल्याचं चित्र आहे.