Maharashtra Weather forcast : गेल्या 48 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (Cyclone Mocha) निर्माण झाल्याने देशातील विविध भागात पावसाने धुमाकूल घातला आहे. कमी दाबाचा पट्टा तसेच वाऱ्याची खंडितता मराठवाड्यातून जात आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच विदर्भात पाऊसाची तीव्रता ही जास्त असणार आहे, असा इशारा हवामान विभागाच्या (IMD) वतीने देण्यात आला आहे.
हवामान विभागाने (IMD Weather Alert) दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे राज्यातील आद्रता कमी होईल.त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊसाचे प्रमाण हे कमी होणार आहे. कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात देखील 3 मे ते 7 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Forecast Update yellow alert to pune and other 33 districts)
राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र येथे देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.आणि विदर्भ येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Cyclonic Storm likely over Bay of Bengal. pic.twitter.com/HySv6WXRPd
— India Meteorological Department (@Indiametdept) May 3, 2023
दरम्यान, पुण्यात येत्या 5 दिवस पाऊस धुमाकूळ घालू शकतो. आज पुण्यात ढगाळ वातावरण होतं. तर काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे आता त्याचा परिणाम विविध राज्यात दिसून येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता आहे.