Bhimashankar Temple Pune : यंदाच्या वर्षी अधिक आणि श्रावण महिना एकत्र आल्यामुळे तीर्थक्षेत्रावर गर्दी होताना पहायला मिळत आहे. त्यातच आंबेगाव तालुक्यात बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे अधिक आणि श्रावण महिना एकत्र आल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अधिक महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होत असल्याने आणखी गर्दी होणार आहे. त्यामुळे भीमाशंकर देवस्थांनकडून मंदिर परिसरात मोबाईल वापरास बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे ही गर्दी होत आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर परिसरात मोबाइल वापराला बंदी घालण्यात आली आहे. भीमाशंकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात.
श्रावण महिन्यात दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक अनुचित प्रकार घडत असतात. त्याचा त्रास मंदिर प्रशासनाला सहन करावा लागतो. मात्र यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाकडून सर्वानुमते हा मोबाईल बंद करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रे काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. जर या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बारा जोर्तिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या भिमाशंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर मंदिर परिसरात भाविकां वर्दळ वाढली आहे. यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील होत आहे. भिमाशंकराचे मंदिर हे पुरातन हेमांडपंथी पद्धतीचे असून मंदिरात शंकर पार्वतीचे एकत्र असलेले शिवलिंग हे केवळ भीमाशंकर येथेच आहे. त्यामुळे भाविकांची येथे नेहमीच गर्दी आसते. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.