मुंबई : तमाम महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी... येत्या २४ तासांत महाराष्ट्र ओला चिंब होणार आहे... पुढच्या २४ तासांत कुठल्याही क्षणी मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल होईल... ९ आणि १० जून या दोन दिवशी मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे येणारा वीकेण्ड हा ओलाचिंब वीकेण्ड असणार आहे.. पावसाळ्यात कधी मोठी भरती येणार आहे, त्यावर नजर टाकूया...
१५ जून - १ वाजून १८ मिनिटांनी ४.९२ मीटर उंचीच्या लाटा
१६ जून - २ वाजून ६ मिनिटांनी ४.९१ मीटर उंचीच्या लाटा
१४ जुलै - १ वाजून २ मिनिटांनी ४.९६ मीटर उंचीच्या लाटा
१५ जुलै - १ वाजून ४० मिनिटांनी ४.९७ मीटर उंचीच्या लाटा
१२ ऑगस्ट - १२ वाजून ४१ मिनिटांनी ४.९५ मीटर उंचीच्या लाटा
१३ ऑगस्ट - १ वाजून २६ मिनिटांनी ४.९६ मीटर उंचीच्या लाटा
१० सप्टेंबर - १२ वाजून १८ मिनिटांनी ४.८५ मीटर उंचीच्या लाटा
११ सप्टेंबर - १२ वाजून ५८ मिनिटांनी ४.८३ मीटर उंचीच्या लाटा
दरम्यान, मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे. अशा स्थितीत भारतातील सुमारे १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण भारतात पावसाचे आगमन झाले असून, अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दर, पूर्व भारतातही पाऊस अडचणी वाढवू शकतो. मध्यप्रदेश, पंश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र (विदर्भ, कोकण), गोवा, तामिळनाडू, तेलंगना, अर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी आदी राज्यांना इशारा दिला आहे. तर अंदमान-निकोबार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मोझोराम, त्रिपूरा, तेलंगना, रायलसीमा, आंध्र प्रदेश, केरळ या ठिकाणी पाऊस मुसळधार सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूरसह १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.