पुणे : पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचं काम गेली ३ वर्ष रखडलंय. त्याविरोधात नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
नाट्यप्रेमी कलावंतांनी गोंधळ सादर करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी २० कोटींची आवश्यकता आहे. मात्र आतापर्यंत केवळ २ कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्यामुळे इथलं काम रखडलंय.
अशीच अवस्था शहरातील इतर ३ मिनी थिएटर्सच्या कामाची आहे. असं असताना, जोपर्यंत या तीनही ठिकाणचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यँत सध्या चर्चेत असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला हात घालू नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय.