जळगाव : राज्यात गाजलेल्या एमपीएससी घोटाळ्यातील पंधरा क्रमांकाचा संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या गोलाणी मार्केटमधील मुख्य कार्यालयातून अटक केली.
दरम्यान, अटक केल्यांनतर दर्जी याने दर्जी याने एसीबीच्या कार्यालयातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडले यावेळी झालेल्या झटापटीत एसीबीचे फौजदार जखमी झालेय.
मात्र मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दर्जी याच्यावर एमपीएससीचा पेपरफुट, उत्तर पत्रिकांचे सरकारी लॉकर तोडणे, बनावट उत्तर पत्रिका मिसळणे, फसवणूक, कागपत्रांची हेराफेरी यांसह अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याच्या खटल्यांत वारंवार वॉरंट काढूनही दर्जी कोर्टात गैरहजर राहत होता. अखेर कोर्टाने त्याचे अजामीनपात्र वॉरंट काढले होते. दरम्यान, एसीबीने त्याला अटक करून जिल्हापेठ पोलिसांच्या कोठडीत ठेवलंय. आज त्याला मुंबई हायकोर्टाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.