MSAMB Job 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात. राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्जाची लिंक आणि ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता पुढे देण्यात आला आहे.
विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता जाहीक करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कायदेविषयक / विधी पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विधी अधिकारी या पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदासाठी उमेदावारांना ईमेलवर अर्ज पाठवता येणार आहे. तसेच ते दिलेल्या पत्त्यावरही अर्ज पाठवू शकतात. 29 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवा की दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज भरताना त्यात काही चुकीची माहिती जाणार नाही, याची काळजी घ्या. तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची माहिती खोटी आढळल्यास तुम्हाला नोकरी गमवावी लागू शकते, हे लक्षात असू द्या.
उमेदवारांनी आपले अर्ज पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, तिसरा मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, बी.जे. रोड, पुणे-01 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तसेच उमेदवारांना dirmktms@gmail.comया पत्त्यावर आपला अर्ज पाठवता येणार आहे.