Bandra Station Stampede: छट पूजा आणि दिवाळीसाठी यूपीत जाण्यसाठी वांद्रे टर्मिनसमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी झालीय..मात्र रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली.त्यात 9 प्रवासी जखमी झालेत. या दुर्घटनेमुळे एल्फिस्टन रोड म्हणजेच सध्याच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावर 29 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये एकूण 23 जणांचा मृत्यू झाला होता.
प्रवाशांची प्रचंड गर्दी.. रेल्वेत चढण्यासाठी चढाओढ आणि गोंधळ. वांद्रे टर्मिनसमध्ये जे घडलं त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं. एकाच वेळी शेकडो प्रवासी रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करतात आणि मग जे व्हायचं नव्हतं तेच झालं.. वांद्रे टर्मिनसवर ही अशी चेंगराचेंगरी झालीय. पहाटे पावणेतीनच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुर्घटना घडलीय. रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झालेत. तर त्यातील दोघा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
वांद्रे टर्मिनसच्या फलट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरी झालीय. वांद्रे ते गोरखपूर रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केलीय.. रेल्वे पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी वांद्रे स्थानकातून गोरखपूरला जाणार होती.. पहाटे 2 वाजून 44 मिनिटांनी रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी झालीय. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी केल्यानं चेंगराचेंगरी झालीय.. दिवाळी आणि छटपूजेसाठी हजारो प्रवासी दरवर्षी यूपी आणि बिहारमध्ये जातात.याची रेल्वे प्रशासनाला माहिती आहे.. अस असतांना रेल्वे पोलिस आणि प्रशासन काय करत होतं असा सवाल आता उपस्थित होतोय.रेल्वे प्रशानसाच्या हलगर्जीपणावर आता विरोधकांनी जोरदार टीका केलीय.
छटपूजा आणि दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने लोक आपआपल्या घरी जाण्यासाठी गर्दी करतात. अशाच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारी दृष्य या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतात. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून जखमींची संख्या वाढेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काहींना मार लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाचा गाफीलपणा यासाठी जबाबदार आहे का अशी चर्चा आता होऊ लागली आहे. प्रवाशांची गर्दी दिसत असतानाही रेल्वे पोलिसांनी काहीच का पावलं उचलली नाही.त्यामुळे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होताहेत.. सुदैवानं चेंगराचेंगरीत मोठी दुर्घटना टळली..सकाळी 6 वाजताची ही घटना आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत करण्यासाठी मदत केली. या रेल्वे स्थानकावर आता गर्दी होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.