विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

 Nagpur School Bus Accident: विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. बस उलटली तेव्हा स्कूल बस मध्ये 8 विद्यार्थी होते.

Pravin Dabholkar | Updated: Jul 1, 2023, 12:44 PM IST
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना  title=

Nagpur Bus Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना समोर आल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान नागपूरमधून शाळेची बस उलटल्याची घटना समोर आलीआहे.

नागपूर जिल्ह्यातील बडेगाव येथे ही घटना घडली. येथे विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. बस उलटली तेव्हा स्कूल बस मध्ये 8 विद्यार्थी होते. सुदैवाने सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत.  विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. 

एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याचे समोर आले आहे. त्याला उपचारासाठी नागपूरात हलविण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याची माहिती देण्यात आली आहे. 

पालघरमध्ये अपघात, दोन चिमुकल्यांचा मृत्यू 

पालघर - पालघर जिह्यातील डहाणू जवळील मोडगाव येथे अपघातात दोन चिमुकल्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव पिकअपने रस्त्याने चालत असलेल्या दोघांना चिरडलं आहे. उधवा -मोडगाव - धुंदलवाडी रस्त्यावर हा अपघात घडला. 

प्रीती मालकरी(11) आणि शाहिद मालकरी (8) अशी या मृत भावंडांची नावे आहेत. अपघातानंतर पिक अप चालक पिकअप घेऊन फरार झाला असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. 

तर दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेण्यात आले आहे.