Nashik Job: नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) - 50, आरोग्य पर्यवेक्षक - 3, आरोग्य परिचारिका - 597, आरोग्य सेवक (पुरुष) - 85, आरोग्य सेवक (पुरुष - हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी - 126, औषध निर्माण अधिकारी - 20, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 14, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - 2, विस्तार अधिकारी - शिक्षण (वर्ग 3, श्रेणी 2) - 8, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) - 3, पशुधन पर्यवेक्षक - 28, कनिष्ठ आरेखक - 2, कनिष्ठ लेखा अधिकारी - 1, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) - 5, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) - 22, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका - 4, कनिष्ठ यांत्रिकी - 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्थे) - 34, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 33, लघुलेखक (उच्च श्रेणी) - 1 ही पदे भरली जातील.
या अंतर्गत एकूण 1 हजार 38 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक
या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 19 हजार 900 ते 1 लाख 12 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
यासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखांची माहिती अधिकृत वेबसाइटवर 7 दिवस आधी देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी येथे भेट देणे आवश्यक आहे. 25 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना वेबसाइटवर अर्जाचा तपशील आणि परीक्षा शुल्क भरावे लागेल. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा
ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 1 महिला आणि 5 पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक पदे भरली जातील. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करताना बंद लिफाफ्यावर 'जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता' असे ठळक अक्षरात नमूद करावे. उमेदवारांनी आपले अर्ज नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे. या पत्त्यावर पाठवायचे आहेत. दिलेल्या मुदतीनंतर आणि चुकीच्या पद्धतीने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.