परदेसिया... म्हणतं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पत्नीने धरला ठेका, पाहा व्हिडीओ

 पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Updated: Mar 9, 2022, 11:37 AM IST
परदेसिया...  म्हणतं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पत्नीने धरला ठेका, पाहा व्हिडीओ

मुंबई : सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीने परदेसीया.... या गाण्यावर ठेका धरला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

‘परदेसिया, ये सच है पिया, सब कहते है तुने मेरा दिल ले लिया’ या गाण्याचं कार्यक्रमात सादरीकरण झालं. या कार्यक्रमात काही महिलांसह सारिका दत्तात्रय भरणे यांनी डान्स केला. पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

'लतायुग' कार्यक्रमाचं खास आयोजन

इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदापूर शहर आणि मैत्रीण ग्रुप यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या गीताद्वारे 'लतायुग' हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ सारिका दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

महिला दिनानिमित्त वेगवेगळअया ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले होते. तसाच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.