Amol Kolhe | "नथुरामची भूमिका ही चूक", इंद्रायणी काठी खासदार अमोल कोल्हेंचा आत्मक्लेश

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज आळंदीत  इंद्रायणी घाटावर आत्मक्लेश केला.  

Updated: Jan 29, 2022, 10:12 PM IST
Amol Kolhe | "नथुरामची भूमिका ही चूक", इंद्रायणी काठी खासदार अमोल कोल्हेंचा आत्मक्लेश  title=

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्हाय आय किल्ड गांधी (why i killed gandhi) या सिनेमात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. गोडसेंची भूमिका साकारल्याने अमोल कोल्हेंवर अनेकांनी टीका केली. तर काहींनी त्यांचं समर्थन ही केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांनीही त्यांचं कलाकार म्हणून समर्थन केलं. मात्र अखेर अनेक दिवसांनी अमोल कोल्हे यांनी आज (29 जानेवारी) आत्मक्लेश केला आहे.  (ncp mp and actor amol kolhe feel repent at indrayani ghat after playing role of nathuram godse in why i killed gandhi movie)

   
अमोल कोल्हे यांनी आज आळंदीत  इंद्रायणी घाटावर आत्मक्लेश  केला. "अनेक युवा कार्यकर्त्यांनी चूक झाल्याचे सांगितले. तुम्हाला आम्ही छत्रपतींच्या भूमिकेत पाहिलंय. नथुरामच्या या भूमिकेत पाहूं शकत नाही अशी भूमिका त्यांनी सांगितलं, म्हणून मी गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आत्मक्लेश करत आहे", असं कोल्हे यांनी स्पष्ट केलं. तसंच "राष्ट्रपित्या विषयी हा संशय होऊ नये म्हणून आत्मक्लेश करत असल्याचंही कोल्हे म्हणाले.