Nationalist Congress Party : राजकारण्यातील चाणक्य आता निवृत्त होणार असं घोषणा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली त्यानंतर कार्यकर्त्यांसह नेतेमंडळी भावूक झाले. मुंबईत 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. (Sharad Pawar Book Lok Maze Sangati) त्यानंतर महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात एकच खळबळ माजली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद पवारच सर्वसर्वे आहेत, हे आज पुन्हा एकदा दिसून आलं. (Maharashtra Politics in marathi)
महाराष्ट्रासह देशातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा विशेष महत्त्व आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला या पक्षाची जडणघडण कशी झाली ते आज आपण जाणून घेणार आहोत. (History of NCP)
या पक्षाची स्थापना 1999 मध्ये शरद पवार यांनी केली. हा पक्ष स्थापन करण्यापूर्वी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्दा लावून धरला. या मुद्दावर शरद पवारांनी एक पत्र लिहिलं आणि त्यानंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. ए. संगमा यांना 6 वर्षासाटी काँग्रेसमधून निलंबित केलं. याच बंडातून या पक्षाची स्थापना झाली.
काँग्रेस पक्षातून निलंबन झालं मग आता पुढे काय...शरद पवारांनी नव्या पक्षाची स्थापना करुन नवी खेळी खेळली. तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांच्यासोबत त्यांनी 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या नावाचा पक्ष जन्माला आला. या पक्षाची स्थापना मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये झाली.
पक्षाची स्थापना झाली आणि अवघ्या 2 महिन्यात शरद पवारांच्या नव्या पक्षाने निवडणुकीत उडी घेतली. या निवडणुकीतून हा पक्ष सत्तेत आला. 1999 स्थापन झालेल्या पक्ष तेव्हापासून 2014 या काळात राज्यात सत्तेवर राहिला. पुढे 2004 ते 2014 काँग्रेसोबत राहून हा पक्ष केंद्र सरकारमध्येही आला. असा हा पक्ष फक्त 5 वर्ष सत्तेपासून दूर राहिला.
अख्खा महाराष्ट्रात या पक्षाला इतकी लोकप्रियता मिळण्यामागे कारण राहिलं ते म्हणजे राष्ट्रवादी हा मराठा नेतृत्वाचा आणि मतदारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये कायम मराठा समाजाला जास्त संधी देण्यात आल्याचं पाहिला मिळालं. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक ही ती त्यातील काही नावं.
पण पुढे जाऊन 2014 च्या दोन्ही निवडणुका आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र हा मराठा मतदार पक्षापासून दुरावला.
प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील आणि सुनील तटकरे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत.