तुषार तपासे, सातारा : एका नव्या व्हायरसने साता-यातील एका 18 वर्षांच्या तरुणाचा बळी घेतलाय.. त्यामुळं आरोग्य विभागाची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. काय आहे हा नवा व्हायरस आणि तो किती धोकादायक आहे?
कोरोनानंतर GBS रोगाची लागण
साता-याच्या फलटण तालुक्यातील याच 18 वर्षांच्या तरुणाला महिनाभरापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. उपचारानंतर तो कोरोनातून बरा झाला. पण काही दिवसांनी त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला. अशक्तपणा येऊन प्रकृती खालावली. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु झाले. त्याला जीबीएस अर्थात गुलियम बेरी सिंड्रोम हा आजार झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. जीबीएसनं या तरुणाचा बळी घेतला..
जीबीएस व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते.
- हा GBS व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनीवर हल्ला करतो
- हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडते
- कोरोनानंतरच GBS शरीरात प्रवेश करू शकतो, असं नाही
- 3 लाखांतील एखाद्या रुग्णाला GBSची बाधा होते
- वेळेत
GBS ची बाधा झाली तर घाबरून जाऊ नका. तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करा. स्वतःची काळजी घ्या.