पुणे : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार ( Narendra Modi government) एक प्रकारचा संभ्रम निर्माण करत आहे. NRC संदर्भात विविध प्रकारची वक्तव्ये आणि भूमिका येत आहेत. देशात आर्थिक मंदी आहे, त्यासाठी हे सरकार काही काम करत नाही. उलट NRC मुद्दा रेटला जात आहे. त्यामुळे आज देशातील जनता केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे. घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे, मात्र जे इथले आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणे योग्य नाही, असे सांगत केंद्र सरकारकडून दडपशाही सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी केला आहे.
ज्या पक्षांनी या कायद्याला मंजुरी देतांना समर्थन दिले होते त्या पक्षांची राज्य सरकारे आज हा कायदा आपल्या राज्यात लागू करण्याचा विरोधात आहेत. देशात महागाई वाढलीय, बेरोजगारी वाढलीय आहे. आर्थिक मंदी आहे. मात्र मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित कटण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे. केंद्र सरकारने एक प्रकारचा संभ्रम निर्माण करत आहे. देशात आर्थिक मंदी आहे, त्यासाठी मोदी सरकार काही काम करत नाही. उलट NRC मुद्दा रेटला जात आहे. त्यामुळे देशात आज असंतोष पसरला आहे. याला भाजप सरकार जबाबदार आहे, असा हल्लाबोल पायलट यांनी केला.
Breaking news । केंद्र सरकारकडून संभ्रम निर्माण केला आहे. NRC संदर्भात विविध प्रकारची वक्तव्ये आणि भूमिका येत आहेत. देशात आर्थिक मंदी आहे, त्यासाठी सरकार काही करत नाही. मात्र NRC मुद्दा रेटला जात असल्याने देशातील जनता सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे - काँग्रेस नेते सचिन पायलट pic.twitter.com/V62ksamfyH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 26, 2019
देशातील महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करण्याचे वातावरण तयार केले जात आहे. त्याचवेळी केद्र सरकारकडून दडपशाही सुरू आहे. हा कुठल्या एका धर्माचा विषय नाही, तर संबंध देशवासीयांशी संबंधित विषय आहे. जिथे आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तिथे बाहेरच्यांची चिंता करण्याचे करण्याचे कारण काय, NPR ही NCR चाच भाग आहे. घुसखोरांना बाहेर काढायलाच पाहिजे, मात्र जे इथले आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणे योग्य नाही, असे पायलट म्हणालेत.