मुंबई : Zilla Parishad Election 2021 : राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचे कल हाती येऊ लागले आहेत. (ZP Election Result 2021)या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल हाती येत आहे. काही मतदारसंघात भाजपला तर सत्ताधाऱ्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागत आहे. असाच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे. (Palghar Zilla Parishad) याबाबत शिवसेना ( Shiv Sena) नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवताना शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून त्यांचा मुलगा रोहित गावित (Rohit Gavit) यांना पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, राजेंद्र गावित यांचे पालघरमधील प्रस्थ असल्यामुळे रोहित यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना पराभवाचा बसला आहे. भाजपचे उमेदवार पंकज कोरे विजयी झालेत.
निवडणूक निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. पालघर जिल्हा परिषदमध्ये समाधान कारक निकाल लागला आहे. शिवसेनेने 5 जागा जिंकल्या आहे यामध्ये एकूण 11 जागा महाविकास आघाडीने जिकल्या आहे. गावित यांच्या जागेसाठी पुढे पुन्हा काम करणार आहोत. शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. ते मान्य करावे लागेल. पुन्हा आम्ही त्या जागेसाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करू, असे एकनाथ शिंदे म्हटले.
कोणी किती युती या आघाडी केली, त्याचा परिणाम हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला झालेला नाही. राज्यात देखील महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले आहे. या निवडणुकीतप्रमाणे येणारी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढवणार आणि जिंकणार, असे ते म्हणाले. या निवडणुकीत कोणताही आरोप-प्रत्यारोप झाला नाही. जनता सुज्ञ आहे. जनतेने दिलेला हा कौल आहे, असे ते म्हणाले.