पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चोरांंनी लूटलं, केली जबर मारहान

पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चार चोरांकडून बंदूकीचा धाक दाखवून शस्त्राने बेदम मारहान करुन लुबाङण्यात आलं आहे. चोरटयांच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Updated: Jul 9, 2017, 10:06 AM IST
पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चोरांंनी लूटलं, केली जबर मारहान  title=

पुणे : पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाला चार चोरांकडून बंदूकीचा धाक दाखवून शस्त्राने बेदम मारहान करुन लुबाङण्यात आलं आहे. चोरटयांच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास हिंजवडीहून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवासी पकंज कदम याने एका खाजगी स्कार्पियो कारकडे लिफ्ट मागितली.  या गाडीत अधीपासूनच चार प्रवासी होते. त्यामुळे गाडी मुंबईला जात असल्याचे कदम यांना सांगण्यात आलं. मात्र कदम गाडीत बसल्यानंतर ही गाडी किवळे गावाजवळ थांबवण्यात आली आणि गाडीतील चौघांनी कदम यांना बंदूकीचा धाक दाखवला आणि मारहाण करुन त्यांच्याजवळील मोबाईल पैसे, एटीएम कार्ड लुटून पळ काढला. जखमी अवस्थेतील प्रशांत कदम यांना गस्तीवर असणाऱ्या डेल्टा फोर्सच्या कर्मचा-यांनी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.