Today Petrol Diesel Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणतीही कपाच झालेली नाही. या इंधनांच्या किमती इंडियन ऑइल कॉर्पोरेश, भार पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ठरवतात. कच्चा तेल स्वस्त होऊन किमती कमी करुन या कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी खरेदी किंमत 93.45 रुपये आहे. तर 13 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्राच्या किमतीत किंचित बदल झाला होता. दरम्यान गेल्या महिन्यात 31 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील डिझेलचे दर 0.01 टक्क्यांच्या वाढीसह सरासरी 93.44 रुपये प्रति लिटरवर बंद झाले. जाणून घ्या महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...
आज महाराष्ट्रात पेट्रोल 106.86 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 93.45 रुपयांनी खरेदी-विक्री होत आहे. गेल्या महिन्यात, 31 जानेवारी 2024 रोजी, महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर 0.01 टक्के वाढीसह सरासरी 106.85 रुपये प्रति लिटरने बंद झाले. दररोज सकाळी 6 वाजता इंधन दर जाहीर केले जातात. तर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. कोलकाता पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रति लिटर डिझेल 3 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यांचा पेट्रोलवरील नफा कमी झाला आहे. पेट्रोलवरील नफा आणि डिझेलवरील तोटा कमी झाल्यामुळे कंपन्या किरकोळ दरात कपात करण्याचा प्रयत्न करत आहेत. एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर
ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.46 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर