Pm Modi in America: अमेरिकेत सध्या कडाक्याची थंडी पडलेली असूनही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा या महासत्ता राष्ट्राच्या दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मात्र तिथं वास्तव्यास असणाऱ्या अनेक भारतीय नागरिकांनी हजेरी लावली. यानंतर लगेचच त्यांनी वॉशिंग्टन डीसी इथं एका अतीव महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट घेतली. ही व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं अमेरिकेच्या राजकारणात आणि त्याहूनही नवनिर्वाचित ट्रम्प सरकारमध्ये असणारं स्थान पाहून सारे हैराण झाले.
ही व्यक्ती म्हणजे यूएस डायरेक्टर ऑफ नेशनल इंटेलिजेंस (डीएनआय) तुलगी गबार्ड. या मुलाखतीमध्ये मोदी आणि गबार्ड यांच्यामध्ये भारत अमेरिकेतील मैत्रीपूर्ण नात्याच्या धर्तीवर विविध मुद्दे केंद्रस्थानी आणत त्यावर चर्चा करण्यात आली.
तुलसी गबार्ड या अमेरिकी राजनैकित लष्करी अधिकारी असून, सध्या त्या डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालिका म्हणून काम पाहत आहेत. पंतप्रधानांच्या भेटी आधीच काही क्षणांपूर्वी त्यांना या पदावर नियुक्त करत त्यांच्यावर पदभार सोपवण्यात आला होता.
अमेरिकी नॅशनल गार्डमध्ये सेवा देणाऱ्या तुलगी यांनी इराकसोबतच्या युद्धात सहभाग घेतला. राजकारणात सुरुवातीपासूनच त्यांनी डेमोक्रेटिक पार्टीला साथ दिली. अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार अशी त्यांची ओळख असून, त्यांच्यावर हिंदू संस्कृती आणि मूल्यांचा सर्वाधिक प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. गबार्ड यांची ओळख, त्यांचं काम आणि अमेरिकेत त्या देत असणारं योगदान हे सर्वार्थानं उल्लेखनीय असून, त्यांची ही ओळख अनेकांनाच हैराण करते.
Met USA’s Director of National Intelligence, @TulsiGabbard in Washington DC. Congratulated her on her confirmation. Discussed various aspects of the India-USA friendship, of which she’s always been a strong votary. pic.twitter.com/w2bhsh8CKF
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान मोदीयांनी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात केली. तिथं पोहोचताच भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं तिथं स्वागत केलं. यानंतर मोदी ब्लेअर हाऊस इथं पोहोचले, जिथं त्यांच्या स्वागतासाठी हजर असणाऱ्या अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या अभिवादनाचा स्वीकार त्यांनी केला. कडाक्याच्या थंडीतही आपल्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं जमलेल्या या प्रत्येकाचेच पंतप्रधान मोदींनी आभार मानले.