वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: ''सुषमा अंधारे यांना बोललेला नटी हा माझा शब्द वाईट नव्हता. माझ्या मनात पाप नव्हतं. माझ्या मनात वाईट भावनाही नव्हती, त्या भगिनीचा मला अपमान करायचा नव्हता. पण ताई तू कशी काय बोलते ग देवांवर... थोडी लाज शरम ठेवा'', अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सुषमा अंधारे यांवरती केली आहे. जळगाव येथे दिव्यांग बांधवांना अपंगांचे कार्ड वाटप, महिलांना धनादेश, विधवा महिलांना धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर उपक्रमाबद्दल (latest political update) गुलाबराव पाटीलांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. नाशिक येथे नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ''हे तर होणारच आहे. यापुढे अनेक प्रवेश होणार आहेत. त्यांच्या गटात जे वक्ते आहेत ते महापुरुषांवर टीका करतात. विठ्ठल रुखमाईबद्दल चुकीचं बोलतात. हिंदुत्ववर टीका करतात, त्यामुळे पुढील काळात अनेक प्रवेश होतील असं म्हणत सुषमा अंधारे (sushma andhare) यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी टीका केली. (politician and minister gulabrao patil critises sushma andhare for her statement)
गुलाबराव पाटील म्हणाले, ''मी सुषमा अंधारेंना नटी बोललो तेव्हा किती टीका केली. माझा हेतू वाईट नव्हता. पण ताई तू देवदेवतांवर किती वाईट बोलतेस?'', असा सवाल करत त्यांनी सुषमा अंधारेंना सुनावले. मागील (maharashtra politics) सरकारच्या काळापेक्षा या साडेचार महिन्यात राज्याच्या विकास कामाचे अध्यादेश सर्वात जास्त निघाले असून विकास कामांच्या अध्यादेशावरून सरकारच्या कामाची गती किती वाढली आहे हे लक्षात येते आणि याचाच भाग म्हणजे कोकणामध्ये कामाला सुरुवात झाली आहे. कोकण हा शिवसेनाप्रमुखांचा (shivsena) बालेकिल्ला आहे व या बालेकिल्ल्यात कायम भगवा तेवत ठेवण्यासाठी आमचं काम सुरू झाल्याचे मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.
''हा टिका लावलाय आहे ना गुलाबराव पाटीलांनी, हा छत्रपतींमुळे लावला आणि तुम्ही त्यांच्यावरच टीका करतायत? जो उठतो तो हिंदू देवदेवतांचा अपमान करतोय. साधू संतांवरही टीका करतायत. त्यांना पाप भरावं लागेल'', अशी खिरमिरीत टीका गुलाबराव पाटीलांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावेळी सुषमा अंधारे यांवरही टीका केली आहे. ''कोण म्हणतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, कोण म्हणत आंबडेकरांचा जन्म मध्यप्रदेशात झाला. छत्रपतींच्या चरित्राबद्दल कोणाला काय माहिती नाही त्यांनी उगाच आगाऊपणा करू नये. हे देवांचे देव आहेत. त्यांच्याबद्दल वाकडंतिकडं बोलणं खपवून घेतलं जाणार नाही.'', असं वक्तव्यही यावेळी गुलाबराव पाटीलांनी केले.
ग्रामपंचायतींच्या निवडणूका या कोणत्या पक्षाच्या नसतात. पक्षाचे लोकं तिथे कार्यकर्ते असतात. त्यामुळे आमदार, खासदारांनी या निवडणूकीत भाग घेऊ नये. जो निवडून आला तो आपला आणि त्या व्यक्तीनं चांगलं कामं करावं, ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवर गुलाबराव पाटीलांनी वक्तव्य केले.