Narayan Rane On Arvind Sawant: लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन (No Confidence Motion) जोरदार घमासान पहायला मिळालं. चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचे दोन खासदारांच्या हमरीतुमरी पहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे चांगलेच बरसले. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना चांगलंच फटकारलं. औकात शब्दांचा उल्लेख राणे यांनी सावंतांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ (Narayan Rane Video) शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, हे दाखवताना दिसत आहे, असं म्हणत चतुर्वेदी यांनी सडकून टीका केली आहे. अरविंद सावंत यांनी यापुढे भाजप आणि पंतप्रधानजी आणि अमितजी शाह यांच्यावर बोट जरी उगारलं तर तुमची औकात मी काढेल.. काय खरं आहे ते मी बाहेर काढेल, असं नारायण राणे (Narayan Rane On Arvind Sawant) यांनी म्हटलं आहे.
This man is a minister. Here he is seen displaying the standard of this government and how low it can go. pic.twitter.com/TMzcjpgIYT
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) August 8, 2023
अविश्वास प्रस्तावावर बोलताना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना, हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल सावंत यांनी केला होता. त्यावरून राणे यांनी पुढचा मोर्चा सांभाळला.
आणखी वाचा - 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
तुम्ही शरद पवार यांच्यासोबत गेले तेव्हा तुम्हाला हिंदुत्व नाही आठवलं का? पक्ष वाढवायला पण ताकद लागते, असं नारायण राणे म्हणाले. त्यावेळी नारायण राणे यांनी अरविंद सावंत यांना शिंगावर घेतलं. हा शिवसेनेत कधी आला? मी 1966 चा शिवसैनिक आहे… अरे बस खाली बस, असं म्हणत असताना संसदेचा पारा चढला. त्यावेळी त्यांनी औकात शब्दाचा वापर करत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. त्यानंतर मोठा वाद झाल्याचं दिसून आलं.