पुण्यातील वकीलाचं आज कामबंद आंदोलन

पुण्यामध्ये उच्च न्यायलयाचे खंडपीठ व्हावे ही गेले अनेक वर्षाची मागणी आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2018, 10:10 AM IST
पुण्यातील वकीलाचं आज कामबंद आंदोलन

पुणे : पुण्याला डावलून कोल्हापूरला उच्च न्यायालयाचा खंडपीठ होणार असल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील वकील कामबंद आंदोलन करणार आहे. पुण्यामध्ये उच्च न्यायलयाचे खंडपीठ व्हावे ही गेले अनेक वर्षाची मागणी आहे. 

सर्वाधिक प्रकरणे पुण्यातील

मुंबई उच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे पुण्यातील असतात. त्यासाठी वकील तसेच त्यांच्या अशिलांना मुंबईला जावे लागते असं असतांना पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी आजवर अनेकदा पत्र व्यवहार तसेच आंदोलन झाले आहे. 

कोल्हापूरला सर्कीट बेंच सुरू करण्याचं आश्वासन

तरी देखील पुण्याला उच्च न्यायालयाचे खंडपीठ करण्या ऐवजी कोल्हापूरला सर्कीट बेंच सुरू करण्याचं आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या कामकाजावर वकीलांनी आज बहिष्कार घातला आहे.