Rupali Thombre : सोशल मीडियावर (Social Media) अनेक रिल्स बनत असतात. एखाद्या गाण्यावर ट्रेंड (Trend) आला की तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो. सध्या सोशल मिडियावर भोजपुरी गाणं (Bhojpuri Song) 'पतली कमरिया तेरी' या गाण्यावर लेटेस्ट डान्स ट्रेंड आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स (Reels) बनवत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याच गाण्यावर डान्स करण्याचा मोह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनाही आवरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे इथल्या कार्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संपल्यावर महिला कार्यकर्त्यांनी 'पतली कमरिया' या गाण्यावर रिल्स बनवला.
रिल्सवर झाली टीका
पण या रिल्सवरती काही जणांकडून टीका होतेय. प्रवीण अलई (Pravin Alai) नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने खिल्ली उडवली आहे. या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, 'काय पुणे इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय? अरे काय हा डान्स... राजकीय पक्षाच्या महिला भगिनींना हे अशोभनीय म्हणावे, की पक्षाचा अजेंडा? राष्ट्रवादी पक्षाचे कार्यक्रम आणि बाकी सगळं भारी चाललंय...!' अशी टीका प्रवीण अलई नावाच्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये केलीय. तसंच पुढे त्याने 'आवरा आणि पक्षाला सावरा' असंही म्हटलं आहे. ही पोस्ट या व्यक्तीने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही टॅग केली आहे.
काय पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय?
अरे काय हा डान्स, राजकीय पक्षाच्या महिला भगिनीना हे अशोभनीय म्हणावे, की पक्षाचा अजेंडा? @RRPSpeaks जरा याकडे बघाल.@NCPspeaks चे कार्यक्रम आणि बाकी सगळं भारी चाललंय...!
आवरा ...आणि पक्षाला सावरा.@ChitraKWagh pic.twitter.com/EwfttZEIGd— Pravin Alai (प्रविण अलई) (@PravinAlai) January 26, 2023
रुपाली ठोंबरे यांचं जोरदार उत्तर
मकर संक्रांतीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं व्हिडिओवरुन दिसतंय. व्हिडिओत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांच्या नावाचा बॅनरही दिसतोय. प्रवीण अलई नावाच्या व्यक्तीने व्हिडिओ ट्विट करत टीका केल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
हा कोण हरामी भिकार विचारांच्या... हे आमचे ऑफिस आमच्या मालकीचे आहे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर आम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करायचा हे आमचे स्वातंत्र्य आहे. तुझ्या सारख्या विचारांच्या लोकांमुळे महिला सुरक्षित स्वातंत्र्य नाहीत अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. याचबरोबर आयुष्य, समाज घाण घडवणे एकच कार्यक्रम भाजपचा' अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हाच कोण हरामी
भिकार विचारांच्या हे आमचे ऑफिस आमच्या मालकीचे आहे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर आम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करायचा हे आमचे स्वातंत्र्य आहे.
तुझ्या सारख्या विचारांच्या लोकांमुळे महिला सुरक्षित,स्वातंत्र्य नाही
आयुष्य,समाज घाण घडवणे एकच कार्यक्रम भाजपचा pic.twitter.com/tA8wDK5zTm— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 27, 2023
दरम्यान, प्रवीण अलई याने केलेल्या या पोस्टवर त्यालाच ट्रोल करण्यात येत आहे. कोणी काय करावं हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न असल्याचं लोकांनी सुनावलं आहे.