सांगली : प्रकाश आंबेडकर लहान मुलांसारखे आरोप करतायत, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केलीय. दलितांची मतं घेण्यासाठी कोरेगाव भीमा दंगलीचा वापर केला जात आहे, असा आरोपीही भिडे यांनी केला आहे.
पुण्यातल्या शनिवारवाड्यात एल्गार परिषद घेणाऱ्या नेत्यांना अटक करावी, दंगलीत झालेल्या नुकसान भरपाई एल्गार परिषदेतल्या नेत्यांकडून वसूल करावी, अशी मागणी भिडे यांनी केली आहे.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.