सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांची खंडणीच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खंडाळा येथील सोना अलाईन्स कंपनीच्या मालकाला साताऱ्यातील विश्रामगृहात मारहाण करून खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सातारा सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने उदयनराजे यांना दिलासा मिळाला आहे.
लोणंद इथल्या सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन मारहाण केल्याचा आरोप उदयनराजे आणि त्यांच्या १२ सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला. उदयनराजेंनी २४ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. या संदर्भात त्यांना अटक देखील अटक करण्यात आली होती. पण सातारा न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. याप्रकरणी कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने न्यायालयाने म्हटले आहे.