wine विकून तर पहा, मग.. खासदार इम्तियाज जलील यांनी दिला हा इशारा

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नागरिकांचे आक्षेप मागविले आहेत. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Apr 7, 2022, 09:19 PM IST
wine विकून तर पहा, मग.. खासदार इम्तियाज जलील यांनी दिला हा इशारा title=

औरंगाबाद : किराणा दुकानामध्ये, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री चालू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. मात्र, या निर्णयाविरोधात राज्यात वातावरण पेटले. त्यामुळे आता राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नागरिकांचे आक्षेप मागविले आहेत.

यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( MP imtiaz jaleel ) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे शिवसेनेचे लोक म्हणताहेत की वाईन हे दारू नाही. तर, राष्ट्रवादीचे लोक म्हणताहेत की अनेक देशात पाण्याऐवजी वाईन पिण्यास वापरली जाते. मात्र, आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणार नाही असे ते म्हणालेत. 

सरकारने किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला आमचा कायम विरोध असेल. तरीही सरकार हा निर्णय घेणार असेल तर दुकानांमध्ये wine विक्रीला आलीच तर आम्ही ते दुकान फोडणार हे निश्‍चित आहे. मग, सरकारला काय करायचंय ते करु दे. असा इशाराही खा. इम्तियाज जलील यांनी दिलाय.