कीटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी पवारांनी केलं मोठं वक्तव्य

कीटकनाशकांनी फवारणी करताना राज्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: Oct 23, 2017, 05:00 PM IST
कीटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी पवारांनी केलं मोठं वक्तव्य  title=

नागपूर : कीटकनाशकांनी फवारणी करताना राज्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

घातक कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नयेत म्हणूनच कठोर कायदे करण्यात आले आहेत. जर अशी कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला केंद्रीय कृषी मंत्रालय जबाबदार आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलयं.

दिल्लीत एक स्वतंत्र संस्था कीटकनाशक प्रमाणित करण्याचं काम करते. अप्रामाणित कीटकनाशकं शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असतील तर याला १०० टक्के दोष केंद्रीय कृषीमंत्रालयाचाच आहे असंही पवार यांनी म्हटलंय. शरद पवार हे नागपूरात पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसात विषारी कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतवाळमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूच सत्र सुरू झालं. त्याचं लोण महाराष्ट्राच्या इतर भागातही पसरलं. आता याप्रकरणी पवारांनी केंद्राकडे बोट दाखवल्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.