अमोलची कमाल..एका हाताने टाळी वाजवण्याचा अनोखा विक्रम

अकोल्याच्या तरुणाच्या टाळीची सर्वत्र चर्चा

Updated: Feb 5, 2022, 11:04 AM IST
अमोलची कमाल..एका हाताने टाळी वाजवण्याचा अनोखा विक्रम  title=

जयेश जगड,अकोला- कुठलीही घटना असली की त्या घटनेसाठी एक बाजूचं नाही तर दुसरा पैलू पण असावा यादृष्टीनं
 'एका हाताने टाळी वाजत नाही’असं म्हटलं जात.असं बोलण्यामागचा उद्देश ऐवढाच की एका हातानं टाळी वाजत नसते हा आपल्यापैकी
सर्वांची कल्पना...मात्र अकोल्यातील एका पट्ठ्यानं मात्र कमालच केली..अमोल अनासाने या तरुणाने एका हाताने 'टाळी' वाजविण्याची कला अवगत 
केली आहे. 
  एका हाताने टाळी वाजत नाही किंवा  एक हात से ताली बजती नही असं म्हटलं जातं. पण, मंडळी , आता ही म्हण जरा सांभाळूनच  वापरावी कारण आता एका हातानेही टाळी वाजू शकते.अकोल्याच्या अमोल अनासाने दोन हातांनीच केवळ टाळी वाजते हा समज खोटा ठरवलाय.

 तीस वर्षीय अमोल सध्या एलएलबी करीत आहे.अमोलने एका हाताने 'टाळी' वाजविण्याची अफलातून कला अवगत केली आहे.दहावीपासून एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रयत्न सुरु केला.आपल्या हाताच्या बोटांना रबरासारखे तळ हातावर आपटून त्यामधून टाळी वाजवण्यासारखा आवाज त्याने निर्माण केला.तो उजव्या व डाव्या हातानेही अशाप्रकारे टाळी वाजवण्याची क्रिया करतो.

अमोलच्या घरची परिस्थिती बेताची आहे.अमोलचे वडील कैलास अनासाने हे एका वकीलाकडे कामास आहे तर आई गृहिणी आहे.आज अमोलने  या एका हाताच्या टाळीच्या कलेत विक्रम नोंदवत नाव मोठे केल्याने त्याच्या पालकांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.   

अमोलच्या नावाने  अनेक विक्रम 

 अमोलला वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया या विक्रमाची नोंद करणा-या संस्थेने दोन विक्रमांचे सर्टिफिकेट,दोन मेडल व बॅच देऊन सन्मानित केले आहे.या विक्रमात "फास्टेस्ट वन हँड क्लापिंग इन ए मिनिट" व एका हाताने एका मिनिटात 300 पेक्षा जास्त टाळी वाजतून रेकोर्ड बनवला आहे. मोस्ट अल्टरनेट वन हँड क्लेपिंग इन वन मिनिट" एका मिनिटात दोन्ही हाताने  400 पेक्षा जास्त टाळी वाजवुन विक्रम आपल्या नावर केला आहे.याआधी 2014 मध्ये अमोलने नॉन स्टॉप एका हाताने एका तासात 7 हजार टाळी वाजवून विश्व विक्रम केला होता.