मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.

Updated: Dec 1, 2022, 12:18 PM IST
मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट? title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ (bhandara news) करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे. (students from bhandara have go to home by walking although having a free bus pass)

मानव विकास मंच आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी (st bus) बस पास योजनेतून मुलींना शाळेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. त्यासाठी विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले आहे. मात्र, शाळेत जाण्याच्या आणि शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी वेळेवर बस (bus stop) नाही. त्यामुळे विद्यार्थींनींना बसची ताटकळत वाट बघत रहावे लागते. मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील विद्यार्थिनींना बस वेळेत येत नसल्याने रात्री 7 वाजेपर्यंत अंधारात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थिनी बसची वाट बघत न रहाता, पायपीट करीत गाव जवळ करतात. बसने प्रवास करताना विद्यार्थिनींना अन्य प्रवाशांकडून वाईट अनुभव येत असतो. शिवाय उशिरा रात्रि प्रवासात चांगले लोक नसल्याणे होत असलेल्या या सर्व बाबींमुळे मुलींनी बसचा प्रवास बंद केला असून त्या पायपीट करीत घरी पोहचत असल्याचे सांगत आहे.

बस नाही आली तर..

अनेक मुलींनी असंही सांगितले की त्यांना उशीर बस मिळते आणि त्यामुळे त्या घरी (home) जायला उशीर होतो आणि आमचा अभ्यासही बुडतो. तर काहींनी असे सांगितले की आम्हाला उशीर झाल्यानं आमचे पालकही घाबरतात आणि त्यामुळे ते अनेकदा शाळेत फोन करतात परंतु त्यांच्याकडेही आमच्या पालकांना (parents) सांगण्यासारखे काही उत्तर नसते. 

हेही वाचा - गावची शान! तीन शेतकरीपुत्र एकाच वेळी अग्निवीर; ढोलताशा, डीजे लावून गावभर मिरवणूक

सुरक्षितताही नाही?

आम्ही अकरा वाजता शाळेत जातो परंतु संध्याकाळी सात वाजता वैगेरे आलो की बसमध्येही सुरक्षितेता (security for girls) नसते असं एका विद्यार्थीनीनं सांगितलं. मी अशीच बसमधून जात असतात मला असाच एक अनुभव आला. एक माणूस बसमध्ये बसलेला असताना त्यानं माझ्या हातावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला मला विनाकारण हात लावायचा प्रयत्न केला, अशी माहिती तिनं सांगितलं. 

काय म्हणतात मुख्याध्यापक? 

त्यांच्याकडे पास आहे पण साडेचारच्या सुमारास जेव्हा शाळा सुटते तेव्हा मात्र त्या मुलींना तास पाऊणतास तरी शाळेच्या बाहेर बसची वाट पाहत उभे राहावे लागते आणि त्यामुळे त्यांच्याकडे फूकट पास असूनही त्यांना बसने प्रवास करता येत नाही. अशावेळी ही बाब पालकांशी बोलून या समस्यावर तोडगा (students faces problems for school bus) काढण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर ही गंभीर बाब असल्यानं यात आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत अशी माहिती राजू बांते, मुख्याध्यापक, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी यांनी दिली आहे.