ठाण्यातील रिक्षा, टॅक्सी उद्या बंद, महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग

उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये  ठाणे परिक्षेत्रातील  रिक्षाचालक मालक संघटना  सहभागी होणार आहे. 

Updated: Jan 2, 2018, 11:34 PM IST
ठाण्यातील रिक्षा, टॅक्सी उद्या बंद, महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग title=

ठाणे  : उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये  ठाणे परिक्षेत्रातील  रिक्षाचालक मालक संघटना  सहभागी होणार आहे. 

ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना उद्या सर्व रिक्षा टॅक्सी  बंद ठेवणार आहेत.  ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग मधील संघटनेच्या सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि 10 हजार टॅक्सी उद्या धावणार नसल्याचं संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितलंय. 

त्यामुळे उद्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था बघावी लागणार आहे. त्याच प्रमाणे लाल बावटा रिक्षा संघटनाही बंद मध्ये सहभागी होणार असल्याने कल्याण डोंबिवली मधील सर्वच रिक्षा बंद राहण्याची शक्यता आहे.

डबेवाल्यांची सेवा बंद 

उद्या काही दलित संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबईत ही बंदची हाक दिली गेली आहे. या बंद मुळे वाहतुकीवर परिणाम होतो. जागो जागी वाहतूक खोळंबुन पडते. या मुळे डबेवाल्यांच्या सेवे वर परिणाम होतो. जर जेवणाचे डबे वेळेवर कार्यालयात पोचले नाहीत तर त्याचा उपयोग ही होत नाही.
 
उद्या मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव येथील जी घटना घडली त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा असे आवाहन मुंबईचे डबेवाले करत आहे,अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे. 

मुंबईत स्कूल बस बंद

दरम्यान, मुंबईतही उद्या स्कूल बस न चालवण्याचा निर्णय काही संघटनांनी घेतल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालक संघटनेने हा निर्णय घेतलाय. दर औरंगाबादमधील डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे उद्याचे पेपर पुढे ढकलले आहेत.

औरंगाबादमध्ये शाळा बंद

तसेच औरंगाबादमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्याची माहिती देण्यात आलेय. तसेच पुण्यातही भीमा कोरेगाव पडसादानंतर उद्या होणारे पेपर पुढे ढकल्याची माहिती पुणे विद्यापीठाने दिलेय.