पुणे : धम्माल बालगीतांवर बच्चे कंपनीनं धरलेला ताल. आकाशात सोडलेले फुगे आणि गारेगार आइस्क्रिम अशा मस्त वातावरणात पुण्यात बालविश्व चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली. संवाद पुणे आणि कावरे आइस्क्रिम यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील विजय टॉकीजमध्ये या महोत्सव शुक्रवारी सुरू झाला.
मंकी बात या नव्या मराठी सिनेमानं या महोत्सवाला सुरूवात झाली. सिनेमाचे संगीतकार सलील कुलकर्णी, त्यांचा गायक पुत्र शुभंकर कुलकर्णी, संवादचे सुनील महाजन यांच्यासह बच्चे कंपनीनं सिनेमाचा आनंद लुटला.. उबुंटू, बाल शिवाजी, ओली की सुकी, झेंडा स्वाभिमानाचा आणि श्यामची आई असे सिनेमे या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.