लडाख बस दुर्घटना : महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण

Two jawans Martyr from Maharashtra : लडाखमध्ये झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या दोघा जवानांना वीरमरण आले. खटावचे सुभेदार विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव यांना या अपघातात वीरमरण आले. 

Updated: May 28, 2022, 07:39 AM IST
लडाख बस दुर्घटना : महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण  title=

मुंबई :  Ladakh accident : Two jawans Martyr from Maharashtra : लडाखमध्ये झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या दोघा जवानांना वीरमरण आले. खटावचे सुभेदार विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव यांना या अपघातात वीरमरण आले. 

27 वर्षीय प्रशांत गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक इथले रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. तर सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचं संरक्षण केलं आहे. या दोघांच्या हौतात्म्यामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे. 

लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली आहे. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला. अनेक जवान जखमी झालेत. अपघातानंतर जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या या दुर्घटनेत 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला.

थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला. लष्कराची बस 50-60 फूट खोलवर श्योक नदीत कोसळली. ज्यामध्ये लष्कराचे सर्व जवान जखमी झाले. सर्व जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली.

गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला. लष्कराची बस कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीत पडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, सैनिकांची बस शिबिरातून सब सेक्टर हनिफच्या पुढे जाण्याच्या दिशेने जात होती, त्याचवेळी हा अपघात झाला.