जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांच्या वस्तू अचानक गहाळ होऊ लागल्या. रुग्णांच्या मदतीसाठी दिवसभर धावपळ केल्यानंतर गाढ झोप लागायची. सकाळी उठल्यावर त्यांना आपली वस्तू गहाळ झाल्याचे लक्षात यायचे.
गेल्या अनेक महिन्यापासून रुग्णालयात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्यामुळे येथील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या सर्वांना संशयाच्या नजरेतून पाहण्यात येत होते. विशेष म्हणजे जेव्हा हे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक रात्री गाढ झोपेत असल्याचे तेव्हाच अचानक रात्री तो यायचा.
रुग्णालयातील रुग्णांजवळ असलेलया वस्तू, झोपेत असलेल्या नातेवाईक यांच्याकडील महागडे मोबाईल, वस्तू चोरून तो फरार होत असे. आपली वस्तू चोरीला गेल्याचे त्या नातेवाईकांना सकाळी झोपेतून उठल्यावर समजायचं.
या अचानक वस्तू गहाळ होण्याच्या घटनांची माहिती अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून दिली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र तो काही हाती लागला नाही.
पण, एके दिवशी तो सीसीटीव्हीत नजरकैद झाला. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण नातेवाईकांचे मोबाईल जिल्हा रुग्णालयातून चोरीला जात होते. येथील प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा मोबाईल चोरी करणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्या भुरट्या चोराचा शोध घेत होते. हा भुरट्या सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस अचानक येणाऱ्या त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना सूचना देण्याचं आवाहन अकोला पोलिसांनी केलंय.