अकोला : सर्व मागण्या पुर्णपणे मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिलाय.
कालपासून सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात शेतकरी आंदोलन सुरू आहे. यशवंत सिन्हांसह आंदोलकांनी कालची संपूर्ण रात्र अकोला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरच काढली. यशवंत सिन्हा यांनी सरकारकडे एकूण सात मागण्या केल्या. त्यापैंकी सहा मागण्या सरकारकडून मान्य करणात आल्यात.
मात्र नाफेडने शेतमाल किमान आधारभूत मूल्यानं खरेदी करण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत.
सिन्हा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संवाद साधलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सांयकाळपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ममता बेनर्जी, वरूण गांधी, शत्रुध्न सिन्हा आणि अरुण शौरी अकोल्यात दाखल होण्याची शक्यता आहे.