Yuva Swabhiman Party: खासदार नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाच भाजपमध्ये विलीन होणार, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या संस्कृती भवन परिसरात होत युवा स्वाभिन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. खासदर नवनीत राणा कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत असताना नवनीत राणांनी सूचक विधान केले आहे.मी आजही स्वाभिमान पक्षात मी आजही आहे पुढे काय होईल मला माहित नाही,असे म्हणत नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
यावेळी एनडीएकडून लढण्यासाठी कर्यकर्त्यांचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. मोदी, शहा आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला तर त्याला युवा स्वाभिमान पक्ष पाठिंबा देईल असा ठराव मंजूर करण्यात आला. हे सांगताना खासदर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.
मोदी, शहा, फडणवीस आणि रवी राणा जे ठरवतील तो निर्णय मला मान्य आहे. लोकांना अजून उमेदवार सापडले नाही पण आमचा प्रचार पूर्ण झाला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी घेतलेला कोणताही निर्णय मला मान्य आहे, असे त्या म्हणाल्या.
आज मी युवा स्वाभिमान पक्षाची खासदार म्हणून मी इथे उभी आहे पुढे काय निर्णय होईल मला माहित नाही. नवनीत राणाला कसा नेता हवा आहे हे महत्त्वाचं आहे. जनतेला जसा नेता हवा आहे तसा नेता हवा आहे. येणाऱ्या भविष्यातील आपली लढाई सोपी नाही. मी कुठे जात नाही मी स्वाभिनची आहे असे म्हणत खासदर नवनीत राणा यांना पुन्हा अश्रू अनावर झाले.
यावेळी नवनीत राणा यांनी ओवेसींच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. काही लोक टीका करत असताना आपल्या मर्यादा विसरून जातात. माझा बाप काढणाऱ्या ओवेसीला माहीत नाही माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज आहे, असे विधान त्यांनी केले.
नवनीत राणा यांनी जे काम केलं त्यांची दखल नरेंद्र मोदी यांनी घेतली. अधिवेशन काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी मला संकेत दिला होता जेव्हा ते डिक्लेअर करतील तेव्हा आम्ही त्याना एनडीएचा घटक म्हणून नवनीत राणा यांच्या मागे पाठीशी उभे राहू आणि भाजपाला पाठिंबा देऊ, देशाच्या पार्लमेंटमध्ये एक चांगला खासदार पाठवू, असे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले.
नवनीत राणा यांना 3 लाख मताच्या फरकाने निवडून येईल.जो संकेत मला आला आहे. त्याचा आम्ही ठराव घेतला आहे. लवकरच केंद्र पातळीवर तो निर्णय लवकर होईल.मात्र मी युवा स्वायमान पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि शेवटपर्यंत युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील, असेही ते म्हणाले.
नवनीत राणा आता आपल्या पक्षांमध्येच आहे. मात्र जेव्हा त्या काही वेगळ्या निर्णय घेतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि आधीपेक्षा दुप्पट काम करू. नवनीत राणा यांना निवडून आणू. नवनीत राणा यांच्या भाजपा पक्षप्रवेश याबाबत रवी राणा यांनी सूचक वक्तव्य केले आहे.