गोविंद तुपे, झी मीडिया, लोणावळा : शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनामुळे पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील (Mumbai Pune ExpressWay) सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. एक्स्प्रेसवे हा मृत्यूचा सापळा ठरतोय. मात्र त्यामागे अनेक कारणं आहेत. हीच कारणं शोधण्यासाठी झी 24 तासनं एक्स्प्रेसवेचा (Zee 24 Taas Reality check) पंचनामा केलाय. या पंचनाम्यात आमच्या टीमच्या हाती धक्कादायक माहिती समोर आलीय. तुम्ही जे एक्स्प्रेस वेवर इमर्जन्सी नंबर पाहतात त्यांची नेमकी काय अवस्था आहे यावरचा हा रियालिटी चेक. (zee 24 taas reality check on mumbai pune expressway emergecny service after leader vinayak mete accidental death)
वाहतुकीच्या नियमानुसार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर थांबण्यास मनाई आहे. तुम्हाला तातडीचं काही काम असेल तरच तुम्ही एक्स्प्रेस वेवर थांबू शकतात. मात्र काही प्रवासी सुसाट धावणाऱ्या वाहनांची तमा न बाळगता चक्क पर्यटकांसारखं पर्य़टन करत असल्याचं चित्र आम्हाला दिसलं.
कुणी भर रस्त्यात माकडांना खाऊ घालत होतं. तर कुणी सेल्फी काढत होतं. त्याचीच तक्रार करण्यासाठी आम्ही या एक्स्प्रेस वर देण्यात आलेल्या इमर्जन्सी नंबरवर कॉल केला.
पहिला कॉल - दुपारी 01.01 वा.
दुपारी 01.33 वा.
अजूनही कुणी आलेले नाही.
दुसरा कॉल - दुपारी 01.34 वा.
सावंत (फोनवरील व्यक्ती) - पेट्रोलिंगची व्हॅन पाठवली आहे.
दुपारी 01.40 वा.
अजूनही कुणी आलेले नाही.
एक्स्प्रेसवेवर मदत हवी असेल तर इमर्जन्सी नंबरवर किती तातडीनं दखल घेतली जाते याचा झी 24 तासच्या रियालिटी चेकमध्ये पर्दाफाश झालाय. जर तब्बल पाऊण तास ईमर्जन्सी कॉलची दखल घेतली जात नसेल, तर अपघातापेक्षा ही ढिम्म यंत्रणाच नागरिकांचे अधिक बळी घेत आहे की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.