Accident: ST बस पलटली आणि... बीडमध्ये भीषण अपघात

ST Bus Accident : घाटातून बस मार्गस्थ होत असताना ड्रायवरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. 

Updated: Apr 18, 2023, 07:10 PM IST
Accident: ST बस पलटली आणि... बीडमध्ये भीषण अपघात title=

Beed Accident :  बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. अरुंद रस्त्यामुळे अंबाजोगाई - मोरफळी एसटी बस बुट्टेनाथ घाटात अपघातग्रस्त झाली. अपघात इतका भीषण होता ही बस पलटली झाले आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. नायब तहसीलदार ,पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली गेली (ST Bus Acciden in Beed ).  

अंबाजोगाईहून मोरफळीला जाणाऱ्या एसटी बसचा मंगळवारी दुपारी बुट्टेनाथ घाटात अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते. अरुंद रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला होता . यामध्ये लहान मुलाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर रस्त्याच्या रूंदीकारणासाठी मागणी करण्यात आली होती. यानंतर आता अंबाजोगाईहुन मोरफळीला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. बस मध्ये 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते.

दोन कारची समोरासमोर धडक 10 जण जखमी

दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकूण 10 जण जखमी झाले आहेत . नांदेड जिल्ह्यात तामसा नांदेड रोडवर पिंपराळा जवळ हा अपघात घडला. स्विफ्ट कार आणि एर्टिगा कार पिंपराळा जवळ एकमेकांवर धडकली. स्विफ्ट कारमध्ये एकजण तर एर्टीगा कारमध्ये 7 महिला आणि दोन पुरुष असे एकूण 9 प्रवासी होते. दोन्ही गाड्यांमधील सर्व जखमी झाले आहेत. जखमींवर तामसा येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलवण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.

कलिंगडच्या आड २ हजार किलो गोमांसाची वाहतूक दोघांना अटक

गोमांसची अवैद्यरित्या वाहतूक होत असल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळली होती. त्यानुसार अंबरनाथ पोलिसांनी डी.एम.सी कंपाऊंड जवळ सापळा रचला. पहाटे साडेचार च्या सुमारास एक गाडी त्यांना दिसली त्यांनी झडती घेतली असता गाडीत कलिंगडचे कॅरेट ठेवलेले होते. मात्र, त्याच्या आड गोमांस पोलिसांना आढळून आले. त्यांनी ते जप्त करून तात्काळ गाडीचा चालक आणि क्लिनर याला ताब्यात घेतले आहे. हे दोघेजण संगमनेरचे असून ते श्रीरामपूर येथून मुंबईच्या दिशेने गोमास घेऊन चालले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.