मुंबई : दादर चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुले बुडालीत. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
अनूप, भारत आणि रोहित अशी तिघांची नावे आहेत. ही तीनही मुले धारावीच्या कुंभारवाड्यात राहणारी होती. अनूप, भारत आणि रोहित तिघेही वुलन म्युनिसिपल शाळेत शिकत होते.
दादर चौपाटीवर सकाळी ११च्या सुमारास दहा ते १२ मुले पोहण्यासाठी आली होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.