मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती.
माझ्यावर झालेल्या अन्यायाची माहिती राज्यपालांनी दिली असल्याचं कंगनाने सांगितलं. मला न्याय मिळायला हवा. मी राजकारणी नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. राज्यपालांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणे ऐकून घेतलं. मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे.
#WATCH I met Governor Koshyari & told him about unjust treatment I've received. I hope justice will be given to me so that the faith of all citizens including young girls, is restored in the system. I am fortunate that the Governor listened to me like a daughter: Kangana Ranaut pic.twitter.com/aZRohVVUhi
— ANI (@ANI) September 13, 2020
#WATCH Mumbai: Actor #KanganaRanaut and her sister Rangoli meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan. pic.twitter.com/d2e4eq9DFA
— ANI (@ANI) September 13, 2020
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनीही कंगनाच्या कार्यालयावर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली होती, त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राज्यपालांनी राजभवनवर बोलवून घेतलं होतं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना रानौत हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली. या प्रकरणात सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं म्हंटलंय.